ताज्याघडामोडी

बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका ‘इतके’ दिवस बंद!

अखेरच्या महिन्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. तीन दिवसांनंतर नववर्षाला सुरूवात होईल. नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेकजण आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात.त्यामुळे अनेकांना बँकेच्या चकरा माराव्या लागतील. अशातच आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. 

वर्षांच्या सुरूवातीला म्हणजेच 1 जानेवारीला रविवारची (Sunday) सुट्टी असल्याने बँक कर्मचाऱ्यांना नववर्षाचा आनंद लुटता येणार आहे. तर 8 जानेवारी हा दुसरा रविवार, 14 जानेवारीला महिन्याचा दुसरा शनिवार, 15 जानेवारीला तिसरा रविवार, 22 जानेवारीला चौथा रविवार, 28 जानेवारीला चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला पाचवा रविवार असणार आहे.

दरम्यान, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त संपुर्ण देशात सुट्टी असणार आहे. तर यासोबतच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 2 जानेवारीला आयझॉलमध्ये बँका बंद राहतील. गान-नागाई, मोइनू इरतपामुळे 3 आणि 4 जानेवारीला इंफाळमध्ये बँका बंद राहणार आहे. चेन्नईमध्ये 16 आणि 17 जानेवारीला तिरुवल्लुवर डे आणि उझावर तिरुनालच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *