ताज्याघडामोडी

‘भाजप मलाही तुरुंगात..’ हसन मुश्रीफ यांच्या कबुलीने राजकारणात खळबळ, म्हणाले..

भाजपमध्ये गेल्याने शांत झोप लागते म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची यापूर्वी कोंडी केली होती. अशात आता हसन मुश्रीफ यांचे वक्तव्यही चर्चेचा विषय बनलं आहे.भाजप मलाही तुरुंगात टाकायला निघाले होते, म्हणत त्यांनी आपण सत्तेत का गेलो याचे अप्रत्यक्षपणे कारणच जाहीर केलं आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून भाजपवर सडकून टीका होत आहे.

ईडीच्या त्रासाने त्रस्त झालेले हसन मुश्रीफ सत्तेत जाऊन बसले आणि ईडीच्या फेऱ्यातून सुटले. ईडीने आणखी कारवाई तीव्र केली असती तर मुश्रीफ आज जेल मध्ये असते. हे आम्ही सांगत नाही तर स्वतः हसन मुश्रीफच सांगत आहेत. दोन वर्षे ईडीच्या कारवाईचा सामना करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना किरीट सोमय्या आणि समरजित घाटगे यांनी चांगलेच जेरीस आणले होते. संताजी घोरपडे आणि गडहिंग्लज कारखान्यात प्रचंड मनी लॉन्ड्रीग केल्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यानी केला होता. तर कारखाना सहकारी न ठेवता स्वमालकीचा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप समरजित घाटगे यांनी केला होता.

ईडीने कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत या बाबी लावून धरत मुश्रीफ यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ होते. मात्र अजित पवार गट सत्तेत सामील झाला आणि मुश्रीफ यांच्या मागे लागलेल ईडीचे सत्र थांबलं. आता मात्र मुश्रीफ यांना हायस वाटत असल्याचं दिसून येतंय. कागल तालुक्यातील कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुश्रीफ यांनी भाजप मला तुरुंगात टाकायला गेलं होतं. मात्र, आता ते कारखाना निवडणुकीत आमच्या सोबत येतील की नाही माहीत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजप सोबत का गेलो याची कबुली दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सेनेने भाजपला चांगलेच कोंडीत पकडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *