Uncategorized

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मधील विद्यार्थ्यांनी पटकावले राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

सांगोला: फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च,मधील मेकॅनिकल विभागातील  विद्यार्थ्यांनी  सोमेश्वर टेक्नोथॉन 2K23 या कार्यक्रमात सहभागी झाले होते.त्यांच्या प्रकल्पाचे शीर्षक: “सौर उर्जेवर चालणारे बहुउद्देशीय कृषी यंत्र” हे होते . या यंत्रास सोमेश्वर टेक्नोथॉन 2K23 मध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम: 15000/- प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे. बिरा.एम.वगरे,सोनाली.टी. वाघमोडे, विश्वजित जाधव, सुनील केंगार या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी डॉ. सुभाष व्ही जाधव (डीन संशोधन आणि विकास),मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. राहुल आवताडे, प्रा. संजय पवार ,प्रा.राहुल पाटील,प्रा.जय गावडे,प्रा.संजय कुलाल, प्रा. प्रदीप पवार, प्रा.शशिकांत माने या प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सौर-संचालित बहुउद्देशीय कृषी यंत्र या प्रकल्पाचा गवत कपणी यंत्र , फवारणी यंत्र , खत टाकणे यंत्र आणि आपत्कालीन दिवा म्हणून हि उपयोग केला जाऊ शकतो.

संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर  डॉ. संजय अदाटे,संचालक डॉ. डी.एस.बाडकर, डिग्री इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ. शरद पवार, प्रा. टी एन जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *