Uncategorized

रूक्मिणी सहकारी बँक लि पंढरपुर च्या खातेदारांना QR कोडची सुविधा उपलब्ध

रूक्मिणी सहकारी बँक लि पंढरपुर चे संस्थापक चेअरमन सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार व संस्थापक सल्लागार मा. श्री विजयसिंह प्रतापराव पवार यांचे वाढदिवसाचे औचित्त साधुन रूक्मिणी सहकारी बँक लि पंढरपुर च्या खातेदारांना QR कोड चे वाटप करण्यात आले त्यावेळी बँकेच्या संस्थापक चेअरमन सौ सुनेत्रा पवार म्हणल्या डिजीटलाजेशनच्या काळात नवीन सुख सोई नवीन आव्हाने स्विकारली पाहिजेत तसेच बँकेच्या खातेदारांना आधुनिक सेवा म्हणुन क्यु आर कोड अत्यंत महत्वाचा आहे. बँकेकडे सेफ डिपाझिट लॉकर्स नियमीत कर्जदाराना व्याजात सवलत., जेष्ठ नागरीक ०.५% ज्यादा व्याजदर, RTGS And NEFT ची सोय, सोनेतारण कर्ज ११% व्याज, व्यु आर कोड चीसुविधा,, विनम्र व तत्पर सेवा, बेदाना पावती तारण कर्जाची सोय, व आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत कर्जाची सोय आहे. त्यावेळी बँकेचे चेअरमन सविता लोखंड़े, व्हा चेअरमन डॉ बी आर पाटील, नवनाथ तांबवे, रविंद्र साळुंखे, सुनंजय पवार, दिलीप चव्हाण, दत्तात्रय निंबाळकर, जयश्री खडतरे, प्रदिप जाधव व बँकेचे खातेदार दत्ताजीराव पाटील हणुमंत गायकवाड़, आरिफ तांबोळी, धरतीराज शिंदे, सुनिल जाधव, महादेव गायकवाड हे उपस्थित होते. सदर कार्यकम यशस्वी करणेसाठी बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी व रूक्मिणी परिवारातील सर्व सदस्यानी प्रयत्न केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *