ताज्याघडामोडी

”पंढरपूर तालुक्यातील विज पुरवठा लवकरच होणार सुरळीत..!”

पंढरपूर तालुक्याच्या वीज प्रश्नी बाबतीत महावितरणचे कार्यकारी अभियंता गवळी साहेब यांच्याशी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांची चर्चा झाली.. शेतकरी व महावितरण यांच्या संवादातून हा प्रश्न सुटू शकतो तरी सोमवारी स्वाभिमानीकडुन होणारा “दंडुका मोर्चा” स्वाभिमानीने स्थगित करावा अशी विनंती महावितरण कार्यालयाने केली आहे.

यावेळी तोडगा काढताना “प्रति मोटार,तात्पुरती थोडीशी” रक्कम भरून सहकार्य करावे व यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावात मिटिंग लावून शेतकरी व अधिकारी यांची संयुक्त बैठक लावून बिल भरण्यास सांगावे.

लाईट चालू होनारच आहे. शेतकरी वाचला पाहिजेच परंतु त्यासोबत महावितरण ही संस्था देखील अडचणीत आहे ती देखील टिकली पाहिजे या करिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

तरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावात गटात मार्ग काढावा सुरळीत करून द्यावी अशा सुचना जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांनी केल्या आहेत.. “उप कार्यकारी अभियंता” कासार साहेब यांच्याशी देखील दूरध्वनीवरून चर्चा झाली त्यांनी देखील मी स्वतः गावोगावी बैठकीसाठी येईन असे सांगितले.

तरी प्रत्येक विभागातील त्या त्या सब स्टेशन मधील अधिकारी यांच्याशी शेतकरी व स्वाभिमानी पदाधिकारी यांनी गावागावात बैठक घेण्याचे ठरले. आता विजपुरवठा सुरळीत होत आहे तसे आदेश महावितरणकडुन दिले गेले आहेत. त्यामुळेच स्वाभिमानीकडुन सोमवारी होणारा “दंडुका मोर्चा” देखील तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे अशी माहिती बागल यांनी दिली आहे.

महावितरणने घेतलेली सहकार्याची भुमिका ही स्वागतार्ह आहे.. थोडी थोडी देणी भरून शेतकऱ्यांनी देखील सहकार्य करायला हवे.. तरच महावितरण व शेतकरी टिकेल असे आवाहन जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *