ताज्याघडामोडी

न्यु साताऱ्याच्या दोन विद्यार्थ्यांची writegen india pvt.ltd.pune या कंपनीत निवड

पंढरपूर कोर्टी – येथील न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील दोन विद्यार्थ्यांची writegen india pvt. ltd ,pune या कंपनीत निवड झाली असून त्यांना वार्षिक पॅकेज 2.10 लाख रुपये आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली.

writegen india pvt. ltd ,pune या कंपनीने न्यु सातारा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेतून मेकॅनिकल विभागातील दोन विद्यार्थ्यांची निवड केली. मागील कित्येक वर्षापासून विविध कंपन्यांमध्ये या कॉलेजचे काम करत आहेत. याचाच परिणाम म्हणून कंपनीने न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच कंपन्यांमध्ये पर्मनंट केले जात आहे.

न्यु सातारा पॉलीटेक्निक  विद्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत  शेकडो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब तसेच संस्थेचे प्रतिनिधी शेंडगे साहेब ,प्राचार्य विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *