पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीकडून चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशोबी संपत्ती किशोर वाघ यांच्याकडे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, याबाबत मला आणि माझ्या पतीला कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी बाजू मांडण्याची संधी देखील मला दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. मी कायदेशीर लढा देण्यासाठी तयार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.
