गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्न करेन तर गंगाधरशीच! लेक ऐकेना, वडिलांनी संपवलं; कळताच प्रियकरानं टोकाचं पाऊल उचललं

कर्नाटकमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. दलित तरुणाशी मुलावर प्रेम करत असल्यानं आणि त्याच्याशी लग्न करायचं असल्यानं वडिलांनी त्यांच्या मुलीची हत्या केली. प्रेयसीच्या मृत्यूबद्दल समजताच प्रियकराला धक्का बसला. प्रेयसीच्या मृत्यूचं दु:ख पचवता न आलेल्या प्रियकरानं ट्रेनच्या समोर उडी घेत जीव दिला. या प्रकरणी कामसमुद्र पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत तपास सुरू केला आहे.

किर्ती असं मृत तरुणीचं नाव आहे. २० वर्षांची किर्ती पदवीचा अभ्यास करत होती. तिचं २३ वर्षांच्या गंगाधरवर प्रेम होतं. ड्रम वादक असलेला गंगाधर उदरनिर्वाहासाठी मजुरीचं काम करायचा. किर्ती कोलार तालुक्यातील बोडागुर्की गावची रहिवासी होती. ती ओबीसी कुटुंबातील होती. तर तिचा प्रियकर अनुसूचित जातीमधील होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वडिलांनी केली आहे.

किर्ती आणि गंगाधर यांचे प्रेमसंबंध होते. त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण किर्तीच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. कुटुंबाचा प्रचंड विरोध झुगारुन देत किर्तीनं गंगाधरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे किर्तीचं कुटुंबाशी भांडण झालं. संध्याकाळी वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी तिची हत्या केली.

वडील कृष्णमूर्ती यांनी मंगळवारी सकाळी किर्तीची गळा दाबून हत्या केली. गंगाधरशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिल्यानं कृष्णमूर्ती यांनी तिला संपवलं. सकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान किर्तीची हत्या झाली. किर्तीची हत्या झाल्याचं गंगाधरला समजलं. त्याला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. गंगाधरच्या भावानं त्याचं सांत्वन केलं. तो त्याला फिरायला घेऊन बाईकवरुन फिरायला घेऊन गेला. गंगाधरनं त्याला रस्त्यात ट्रेन थांबवायला सांगितली. बाईकवरुन उतरताच गंगाधर रेल्वे रुळांकडे गेला. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेनसमोर उडी घेत त्यानं जीव दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *