ताज्याघडामोडी

…तर आम्ही पंतप्रधान मोदी यांना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांनी थेट सांगून टाकलं

पाटण्यात विरोधकांची बैठक झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. केंद्रात पंप्रधान मोदी तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. यानंतर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला आहे. राज्यातून हजारो महिला बेपत्ता ,आहेत असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. तसंच फडणवीसांना इतर वक्तव्यं करण्याऐवजी याकडे लक्ष द्या असा टोला लगावला आहे. तर महिला आरक्षणावरुन थेट पंतप्रधान मोदी यांनी आव्हान दिलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, पाटण्याला एक बैठक झाली तेव्हा प्रधानमंत्री अमेरिकेत होते. ते कळल्यावर त्यांनी व्यक्तिगत हल्ले करायला सुरूवात केली. 13 आणि 14 जुलैला बंगलोरला सगळ्या पक्षाची बैठक होणार आहे. सिमल्यला अतिवृष्टी असल्याने निर्णय बदलला. सांप्रदायिक वातावरण तयार केलं जातंय त्याला सामोरं कसं जायचं याची चर्चा करणार आहे. काल पक्षाच्या चार बैठका झाल्या तिथे आग्रही मागणी झाली. महिलांना आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. यावेळी आपण राज्यात महिलांना आरक्षण दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

पुढे ते म्हणाले की आता विधीमंडळ आणि संसद या दोन ठिकाणी स्त्रियांना आरक्षण द्यायची भूमिका घ्यायला हवी जर मोदीसाहेब भूमिका घेत असतील तर आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ, असं थेट आव्हान पंतप्रधान यांना पवारांनी दिलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याशी वैयक्तिक काही नाही. आत्ताच टिळक पुरस्कारासाठी बोललो ते येतो म्हटलो, अशीही माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *