ताज्याघडामोडी

हसन मुश्रीफांना मोठा धक्का, कोर्टाने अर्ज फेटाळला; आता ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक करण्याची दाट शक्यता

राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या ईडीचा ससेमिरा लागला असून या विरोधात हसन मुश्रीफ यांनी आपल्याला अटक होण्यापासून संरक्षण मिळावं यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता यावर आज सुनावणी पार पडली असून कोर्टाने मुश्रीफ यांचा अर्ज फेटाळला आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांना ईडी कडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर हसन मुश्रीफ आता उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा तर अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकदा अशी छापेमारी केली होती. या छापोमारीतून ईडी अधिकारी घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याचे ही समोर आले होते. तर ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स ही बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं आणि त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे दार ठोठावले.

याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला होता यामुळे हसन मुश्रीफ यांनी ही ईडी चौकशीला सामोरे गेले. यानंतर हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या प्रकरणात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असतानाच दोन्ही बाजूकडून तब्बल दोन ते तीन आठवडे युक्तिवाद झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता.

दरम्यान हा निकाल आज देण्यात आला असून मुंबई सत्र न्यायालय कडून हसन मुश्रीफ यांनी केलेल्या अटकपूर्वक होऊ नये यासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. यामुळे हसनमुश्री त्यांना जोरदार झटका बसला असून कोणत्याही क्षणी त्यांना ईडी कडून अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर या निर्णयाविरोधात हसन मुश्रीफ मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *