ताज्याघडामोडी

व्यायाम करताना ब्रेक घेतला, श्वास घेण्यास त्रास; बॉडीबिल्डरचा अंत, ब्रेडचा तुकडा ठरला कारण

तमिळनाडूमध्ये २१ वर्षांच्या बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घशात ब्रेड अडकल्यानं बॉडीबिल्डरनं जीव गमावला आहे. व्यायाम करतेवेळी त्यानं नाश्त्यात ब्रेड खाल्ला होता. ब्रेडचा तुकडा घशात अडकल्यानं त्याचा मृत्यू झाला. एम. हरिहरन असं बॉडीबिल्डरचं नाव आहे. तो सलेमच्या पेरिया कोलापट्टी भागाचा रहिवासी आहे. कुड्डालोर जिल्ह्यातील वादालूरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धेसाठी तो सराव करत होता. ७० वर्षांखालील गटात तो सहभागी होणार होता.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हरिहरन सराव करत होता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विविध ठिकाणांहून अनेक स्पर्धेत कुड्डालोरला आले होते. सगळे स्पर्धक एका लग्न मंडपात थांबले होते. हरिहरन रात्री ८ वाजता सराव करत होता. त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली. व्यायाम करताना त्यानं ब्रेक घेतला आणि त्यादरम्यान एक ब्रेड खाल्ला. ब्रेडचा एक मोठा तुकडा त्याच्या घशात अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बघता बघता तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीनं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

घाईघाईत न जेवण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. जेवताना काही कडक पदार्थ घशात अडकू शकतात. त्यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांकडे नेण्याच्या आधीच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. एखादा पदार्थ घशात अडकल्यानंतर अनेकदा बोट घालून उलटी करण्याचा प्रयत्न केला जातो. घशात अडकलेला पदार्थ उलटीसोबत बाहेर येईल, असा त्यांचा समज होता. यामुळे लॅरिक्स ऍक्टिव्ह होतात. त्यामुळे फुफ्फुसापर्यंत जाणारी श्वसन नलिकेला बाधा पोहोचते. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *