ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून तरुणीला मिठी, प्रियकरानंतर तिचीही मृत्यूशी झुंज अपयशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी औरंगाबदेत घडली होती. त्याच रात्री प्रियकराचा मृत्यू झाला होता. तर उपचार सुरु असताना ५७ दिवसांनी प्रेयसीची प्राणज्योत मालवली.

पूजा कडुबा साळवे (वय २८ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर गजानन खुशलराव मुंडे (वय २९ वर्षे) असे मृत प्रियकराचे नाव आहे.

या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात गजानन, तर शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात पूजा शिक्षण घेत होती. नित्याप्रमाणे २१ नोव्हेंबर रोजी पूजा विभागात गेली होती. दरम्यान तिचा पाठलाग करत गजानन देखील तेथे पोहोचला. त्याने बॅगमधील पेट्रोलची बाटली काढून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले व थोडे पेट्रोल इतरत्र फेकले, त्यानंतर स्वतःजवळील लायटरने स्वतःला जाळून घेतले.

तिथे उपस्थित असलेल्या महिला प्राध्यपकाने पूजाला पळून जाण्यास सांगितले मात्र गजाननने दरवाजा आतून बंद करून पूजाला मिठी मारली. यामध्ये दोघेही गंभीररित्या जळाले होते. आरडाओरड झाल्याने विभागातील इतर कर्मचारी-अधिकारी धावून आले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात हलविले, मात्र त्याच रात्री उपचारादरम्यान गजाननचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *