एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “पीआयसी मायक्रोकंट्रोलरचे परिधीय वैशिष्ट्य आणि प्रोग्रामिंग” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या सुरुवातीस रविकांत खामितकर यांचे विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी स्वागत केले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रविकांत खामितकर यांनी पिक मायक्रोकंट्रोलर ची माहिती दिली. या मायक्रोकंट्रोलर ची वैशिष्ट्ये , त्याचा वापर कसा करावा याची प्रात्यक्षिके करून दाखवली.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कु. साक्षी शिंदे यांनी केले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी, प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा. गणेश बिराजदार सह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
