ताज्याघडामोडी

दशनाम गोसावी धर्म संस्कार व राज्यव्यापी वधू-वर पालक सभा संपन्न

शनिवार व रविवार रोजी दिनांक १२ व १३ नोव्हेंबर गणेशनाथ मंगल कार्यालय, पंढरपूर येथे पार पडला. शनिवारी प्रदर्शना रोड मार्गे गुरुवर्य तपोनीधी महंत नरेंद्र गिरी, महेंद्र शांतीगिरी महंत समाधान गिरी, महंत संतोष गिरी, महंत सुंदरगिरी या सर्व महंताना रथामध्ये बसवून दोनशे बसह व जोगदंड मठातील छोटे वारकरी समाजातील महिला व पुरुष यांच्यासह प्रदक्षणा मार्गे शोभा यात्रा काढण्यात आली सर्व महंतांनी सर्व बटुंना शनिवारी रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत धर्मसंस्काराचा बिजाहोम करण्यात आला.

रविवारी राज्य स्थरीय वधू-वर मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेश गिरी यांच्या अध्यक्षतेखाली दलीत मित्र राम भारती, राष्ट्रीय उपध्यक्ष डी.के.गोसावी सर, कार्यध्यक्ष धन्यकुमार पुरी खानदेश अध्यक्ष साहेबरावपुरी राष्ट्रीय सरचिटणीस नंदकुमार गोसावी, मराठवाडा अध्यक्ष संपतपुरी तसेच स्वागत अध्यक्ष हेमंत गोसावी कार्यअध्यक्ष अंकुश गोसावी व खजीनदार लक्ष्मण गोसावी सर यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन दीप प्रज्वलन करण्यात आले.वधू-वर मेळाव्यात २०० मुलांनी सहभाग घेतला होता.प्रास्ताविक पंढरपूरातील अध्यक्ष मुन्नागीर गोसावी यांनी केले.

पांडूरंग या स्मरीणीकेचे प्रकाशन करण्यात आले. श्री प्रमोद बन गोसावी अधिक्षक अभियंता, स्वप्नील पुरी अधिक्षक अभियंता, अविनाश सर,सौ. आशा पुरी यांचा सन्मान करण्यात आला.यात चार जनाचे विवाह जुळून आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण सर, सतिश बुवा गोसावी, अविनाश सर, रमेश गिरी सचिन पुरी, अर्जुन पुरी, शंकर महाराज, सुधाकर बन, उत्तम महाराज, शांताराम गोसावी, दत्तात्रय पुर अनिल बन, अॅड. सचिन गिरी, जेवन विभाग सुनिल गोसावी, बबन गोसावी, राजकुमार गोसावी, उमे गोसावी, पुरुष बांधवाबरोबर समाजातील महिला भगिनींनी श्रीमती शिल्पा गोसावी, रजणी गोसावी, सुनि गोसावी, मंगल गोसावी, सुरेखा गोसावी, सुनिता गोसावी, कविता गोसावी, विरमाता वृंदाताई गोसावी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले. राष्ट्रगितानी कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *