गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई 

नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई 
दुचाकींसह ९१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात 

 

    पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर कारवाई करीत  दुचाकींसह ९१ हजरांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.करकंब पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पो.काँ. सज्जन भोसले,पो.ना.सुळ,पो.ना.कांबळे,पो.ना गोरवे हे अवैध धंदे व गुन्हेकामी तपास करण्यासाठी पेट्रोलींग करीत असताना नांदोरे मुख्य चौक येथे आले असता नांदोरे स्मशानभूमी जवळ काही लोक 52 पत्याच्या डावावरती तिरट नावाचा जुगार खेळत आहेत अशी बातमीदारामार्फत माहिती मिळाली.सोबत दोन पंच घेऊन हे पथक तेथे दाखल झाले असता स्मशानभूमीच्या उत्तर बाजुस खाली ६ इसम गोल रिंगन करुन बसलेले दिसले व त्यांचे हातात व समोर पत्ते होते. तसेच त्यांचे मधोमध पैसे पडलेले दिसले.चे बाजुस मोटार सायकली लावलेल्या मिळुन आल्या.
     या प्रकरणी 1) लक्ष्मण भगवान पाखरे, वय -54 वर्शे रा.सरकार वाडा, नांदोरे ता.पंढरपुर 2) सुधिर महादेव गुंड वय -30 वर्शे रा.भिंगारे वस्ती, नांदुरे ता.पंढरपुर 3) ज्ञानेष्वर प्रभु माने वय -37 वर्शे रा.नांदारे ता.पंढरपुर 4) षत्रुघ्न मारुती कदम, वय -60 वर्शे रा.सब डिव्हिजन नांदोरे ता.पंढरपुर 5) लक्ष्मण बाबा भिंगारे, वय -50 वर्शे रा.भिंगारे वस्ती नांदोरे ता.पंढरपुर 6) अभिमान कृश्णा भिंगारे , वय -35 वर्शे, रा.भिंगारे वस्ती, नांदोरे ता.पंढरपुर यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे सरकार तर्फे पो.काँ. सज्जन भोसले यांनी फिर्याद दाखल केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *