सांगोला :येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
विभागातर्फे विद्यार्थी ,पालक व शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला .
विद्यार्थी पालक व
शिक्षकांमध्ये संवाद व्हावा व विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना समजावी या
उद्देशाने मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते . दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आल्यानंतर
उन्हाळी परीक्षा २०२२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. महेश वाळुंजकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे आयॊजीत करण्यात आलेले विविध उपक्रम, टेस्ट सिरीज ,
सामाजिक उपक्रम यासंदर्भात माहिती दिली. पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.
शरद पवार यांनी
रोजगाराभिमुख विद्यार्थी तयार होण्याच्या अनुषंगाने महाविद्यालया मार्फ़त आयोजित
करण्यात येणाऱ्या टेक्निकल वर्कशॉप, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, तसेच
महाविद्यालया मध्ये
उपलब्ध असणाऱ्या डिजिटल लायब्ररी यासारख्या साधनांचा उपयोग करून
विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करण्या बरोबरच पालकांची शैक्षणिक
अपेक्षा पूर्ण करून त्यांना आनंद देण्याचे
आवाहन केले. या वेळी पालक प्रतिनिधी श्री. सिध्दनाथ मेटकरी यांनी
महाविद्यालया मार्फत
पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे
प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गणेश शिंदे यांनी केले
. हा कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील प्रा. राहुल
काळे व प्रा.स्नेहल
ठोंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर पालक मेळाव्यास विभागातील सर्व
शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
