ताज्याघडामोडी

अप्रमाणित तणनाशकाची विक्री,द्राक्ष बागायतीचे नुकसान

करकंब येथील कृषी केंद्र चालकासह उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल 

ऑक्टोबर छाटणीवेळी तणनाशकांचा वापर केल्यानंतर छाटणीनंतर द्राक्ष बाग फुटली नाही अशा आशयाची तक्रार करकंब व बार्डी परिसरातील शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती.करकंब येथील ओंकार कृषी केंद्र येथून खरेदी केलेले तणनाशक फवारल्याने हा प्रकार घडला आहे अशी या शेतकऱ्यांची तक्रार होती.सदर तक्रार प्राप्त होताच पंढरपूर तालुका कृषी अधिकारी हनुमंत सरडे यांच्यासह पथकाने करकंब येथील ओंकार कृषी केंद्राची तपासणी केली असता कीटकनाशके  अधिनियम १९६८ मधील तरतुदींचा भंग केल्याचे दिसून आले.मॉडर्न अग्रिजेनेटिक्स लिमिटेड कंपनीच्या तणनाशकाच्या बाटल्या विक्रीस ठेवल्याचे आढळून आले होते.
        सदर पैकी एका तणनाशकाच्या एका बाटलीचे सॅम्पल पुणे येथील लॅब मध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले तर सदर मॉडर्न अग्रिजेनेटिक्स लिमिटेड कंपनीस कीटकनाशके उत्पादन अथवा विक्रीचा परवाना निर्गमित करण्यात आला नसल्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त झाले असल्याचे धनंजय दिनकर पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक सोलापूर कृषी अधीक्षक कार्यालय यांनी करकंब पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले असून सदर ओंकार कृषी केंद्र करकंब व मॉडर्न अग्रिजेनेटिक्स लिमिटेड विरोधात भादंवि ३४,४२० सह कीटकनाशक अधिनियम १९६८ व १९७१ मधील विविध तरतुदीनुसार करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *