ताज्याघडामोडी

झोका खेळताना गळफास लागून 11 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

धक्कादायक घटना

आपल्याकडे अनेक प्रकारचे खेळ  जातात. त्यातलाच एक खेळ म्हणजे आपण झाडाला किंवा उंच छताला दोरे बांधून झोका खेळला जातो. या झोक्याची लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्ये तर प्रचंड क्रेझ आहे. मात्र हा झोका खेळण्यास कधीकधी किती महागात पडतं, हे दाखवणारी एक घटना भिवंडीत घडली आहे. झोका खेळणं या तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. कारण या झोक्याच्या खेळात अकरा वर्षीय चिमुकलीने दुर्दैवाने आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबावर आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या घटनेने भिवंडी परिसरात  सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोणताही खेळ बाळगताना केलेला हलगर्जीपणा किती घातक ठरू शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.

या मुलीचे आई-वडील दोघेही मजुरीचे काम करतात. त्यामुळे सहाजिकच मुलांकडून वेळ देणे जमत नाही. त्या दिवशी ते आपल्या मुलीला खेळायला सोडून मजुरीसाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच त्यांच्या पाठीमागे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीने आपल्या मैत्रिणींसोबत झोका खेळण्यासाठी दरवाज्यात साडी बांधूनच झोका तयार केला होता. मात्र डोक्याला पिळ देत बसलेल्या फासातून ती मुलगी वाचू शकली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *