ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची ‘ग्रेॲटम’ कंपनीत निवड विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यंदाच्या वर्षी ४३० संधी प्राप्त

स्वेरीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची ग्रेॲटम’ कंपनीत निवड

विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यंदाच्या वर्षी ४३० संधी प्राप्त

पंढरपूरः ग्रेॲटम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल २६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

       ‘ग्रेॲटम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून अपूर्वा पोपट शिरसागरगौरी अनिल निगडेज्योत्स्ना राजेंद्र साळुंखेमयुरी बाळासाहेब लोंढेपूजा हिंमत विभुतेपुनम शंकर लवटेप्राजक्ता अशोक साठेप्राजक्ता जयसिंग सातपुतेप्रीती रघुनाथ पिसेरेवती धोंडेशा सोनकवडेऋतुजा प्रदीप पाटीलऋतुजा सुनील टाकसाळेशैलेजा संजय महिमकरशिल्पा शाम डोणेश्रद्धा सतिश गायकवाडस्वाती रामचंद्र दहीहंडीविद्या धनंजय मोरेसायली शामराव कोळीशुभांगी संभाजी चौरेउषा सुनिल  बनसोडेवर्षा बळवंत शिंगाडेधनश्री धनाजी लोखंडेप्रतीक्षा विजय सांजेकरविशाल गंगाधर केंद्रेमहेश बिभीषण कांबळेऋतुराज आबासाहेब  देशमूख या सव्वीस विद्यार्थ्यांची निवड केली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकालसंशोधनेमानांकनेइन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व  मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यंदाच्या वर्षी ४३० संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.’ असे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे हे म्हणतात. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे प्रा. आशिष जाधव व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *