पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवरी संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केले. तर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते यांचे भाषण झालं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. यावर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.
देहू कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्या भाषण का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार यांना भाषण करायचं होतं याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं. मात्र, पीएमओकडून त्यांना लेखी उत्तर आले नाही. हे अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रयांच्या, पालकमंत्र्यांच्या आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉलनुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळे हे धक्कादायक असून चूकीचे असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देहू संस्थानाचे स्पष्टीकरण
दरम्यान, याप्रकरणी देहू संस्थानाने स्पष्टीकरण दिले आहे. देहू मंदिर संस्थाचे प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, हा धार्मिक कार्यक्रम होता. सायंकाळी पंतप्रधान मोदींचा मुंबईत कार्यक्रम होता. त्यानुसार आम्हाला कार्यक्रमाचा प्रोटोकॉल दिल्लीतून आला होता. तसेच हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता.