ताज्याघडामोडी

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक भागांमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असला तरी राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

खरंतर, राज्यात परतीच्या मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. अशात आता हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो जारी केला आहे. महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आता पावसानं परतीची वाट धरली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला वगळता इतर जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *