ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये सुनिल चव्हाण यांचे व्याख्यान संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी डबल आय सी च्या कॅलेंडरच्या अंतर्गत “इनोव्हेशन स्टार्टअप इकोसिस्टम अँड एप्लेअर्स” या विषयावर सुनिल चव्हाण यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानामध्ये सुनिल चव्हाण यांचे स्वागत डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी केले.

यादरम्यान सुनिल चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाले, स्टार्टअप चालू करण्यासाठी आवश्यक कागदपञे व फायनान्स कुठून मिळू शकते याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना दिली. याशिवाय इनोव्हेशन म्हणजे काय ? पाॅवर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये विद्यार्थी वेगळे इनोव्हेशन वापरून स्वतःचा उद्योग सुरू कसा करावा याबद्दल माहिती दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *