ताज्याघडामोडी

पेट्रोल पंपचालकांचे उद्या पेट्रोल खरेदी बंद आंदोलन

पेट्रोलपंप चालकांनी उद्या दि. 31 मे रोजी देशव्यापी पेट्रोल खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व 6500 पेट्रोलपंप सहभागी होणार आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या पेट्रोलविक्री सुरू असेल, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.

शासन व ऑईल कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार, दर सहा महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांशी निगडीत केली असून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 2017 पासून आजपर्यंत इंधनाच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. त्याचबरोबर गुंतवणूक खर्च, बँकांचे व्याज, पगार, वीजबिले आणि शासकीय शुल्क दुप्पट झाले आहे. त्यामध्ये दोन वेळा केंद्र सरकारने अबकारी कपात जाहीर केली. त्यामुळे इंधनाच्या किमती 8 ते 12 रुपयांनी कमी झाल्या.

त्याची अंमलबजावणी ताबडतोब करायला लावली. वास्तविक वितरकांनी जास्त दराने अबकारी कर भरून माल खरेदी केला होता. तो माल विक्री करताना त्यांना कमी केलेल्या अबकारी दराने विक्री करायला बंधनकारक केले. त्यामुळे वितरकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर त्याच्या मुद्दलमध्येही घट झाली, असे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *