ताज्याघडामोडी

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत मुलींची बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. २०२१च्या यूपीएससी निकालाचं हे मोठं यश आहे. श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर, अंकिता अग्रवालने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर UPSC CSE अंतिम निकाल २०२१-२२ जाहीर केला आहे. यावर्षी ६८५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील ४७ उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे.

युपीएससी सीएसईची प्राथमिक परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. याचा निकाल १७ मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिलपासून सुरु झाल्या होत्या. २६ मे पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या. अखेर आज याचा निकाल जाहीर करण्यात आला. युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहावा.

युपीएससीच्या निकालामध्ये पहिल्या १० क्रमांकामधील विद्यार्थी –

१ – ०८०३२३७- श्रुती शर्मा

२- ०६११४९७- अंकिता अग्रवाल

३- ३५२४५१९- गामिनी सिंगल

४- ५४०१२६६- ऐश्वर्या वर्मा

५ – ०८०४८८१- उत्कर्ष द्विवेदी

६- ०८३४४०९- यक्ष चौधरी

७- ०८८६७७७- सम्यक एस जैन

८- ०८०१४७९- इशिता राठी

९- १११८७६२- प्रीतम कुमार

१०- ६३०१५२९- हरकीरत सिंह रंधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *