

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोहन कोळेकर यांच्या मालकीच्या गुरसाळे तालुका पंढरपूर येथे पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपावर दिनांक ११ मार्चच्या मध्यरात्रीस डिझेलचे टाकीतुन 1,92,585 रुपये किंमतीचे 2114 लिटर डिझेल चोरुन नेले आहे अशा आशयाची फिर्याद महेश मोहन कोळेकर पंडहरपूर पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनूसार महेश कोळेकर यांनी 11/03/2022 रोजी सकाळी 09/00 वाजता पेट्रोलपंपावरील पेट्रोल व डीझेल साठवणुक टाक्यांचा स्टक चेक केला होता.त्यावेळी डीझेल साठवणुक टाकीमघ्ये 15297 लिटर डिझेल शिल्लक होते.त्यानंतर रात्री 09/00 वा. चे सुमारास पेट्रोलपंपावरील हिशोब घेवुन ते घरी गेले.दि.12/03/2022 रोजी सकाळी 09/00 वा.सुमारास पेट्रोलपंपाचे डीझेल साठवणुक टाक्यांचा स्टक चेक केला असता, त्यावेळी डीझेल साठवणुक टाकीमघ्ये 10414 लिटर डिझेल शिल्लक मिळुन आले म्हणुन, डिझेल विक्रीचा हिशोब केला असता 2114 लिटर डिझेल कमी मिळुन आले.पेट्रोलपंपावरील सी.सी.टि.व्ही मघ्ये पाहीले असता रात्रचे 02/00 वाचे सुमारास डीझेल टाकीचे डीप पाईप जवळ कंपाऊडचे पाठीमागुन दोन इसम येवुन संशयास्पद हालचालकरीत असताना दिसुन आले असून शेजारील शेतकरी अर्जुन भिमराव कोळेकर यांचे शेतामध्ये डिझेल सांडलेले दिसुन आले. या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्याविरूध्द महेश कोळेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.