Uncategorized

पंढरपूर शहर तालुक्यातील १५ हॉस्पिटलना लसीकरणासाठी परवानगी 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असतानाच जिल्ह्यात कोविड लसीकरणास आता गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या दोन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने मोठी नाराजी व्यक्त होती.परंतु गेल्या दोन दिवसापासून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागली आहे.त्यामुळे खाजगी हॉस्पिटल मधुन देखील पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे.पंढरपूर शहर व तालुक्यातील १५ हॉस्पिटल मध्ये आता सामान्य जनतेसाठी लस उपलब्ध होणार आहे. 
    पंढरपूर शहर व तालुक्यातील पुढील हॉस्पिटलचा  या मध्ये समावेश आहे.
१) राका हॉस्पिटल पंढरपूर
२) धनश्री हॉस्पिटल भाळवणी
३) चिरंजीव हॉस्पिटल  भक्ती मार्ग पंढरपूर
४) अपेक्स हॉस्पिटल महावीर नगर
५) ममता हॉस्पिटल टाकळी
६) सुश्रुत हॉस्पिटल मनीषा नगर
७) बोरावके  हॉस्पिटल
८) डीव्हीपी हॉस्पिटल केबीपी कॉलेज रोड
९) विठ्ठल रुक्मिणी हॉस्पिटल ६५ एकर
१०) वरद विनायक हॉस्पिटल कराड रोड
११)गडम युरॉलॉजी जुना कराड नाका पंढरपूर
१२) टकले हॉस्पिटल नवीन कराड नाका
१३) द्वारका हॉस्पिटल पुणे रोड
१४) गायत्री हॉस्पिटल पदमवती नजीक पंढरपुर
१५) पल्स हॉस्पिटल भटुंबरे या ठकाणी लस उपलब्ध होणार आहे.      
    मात्र लस उत्पादकांकडून लस खरेदी करूनच वरील हॉस्पिटलना लसीकरण करता येणार आहे.त्यामुळे या ठिकाणी लसीकरण केव्हा सुरु होणार याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. आज याबाबत सदर हॉस्पिटल चालकांची बैठक होणार असून यामध्ये विविध उत्पादक कंपन्यांकडून लस खरेदीबाबत विचार विनिमय होणार असल्याचे समजते.केंद्र सरकारने लस उत्पादकांना २५ टक्के कोटा थेट खाजगी हॉस्पिटल साठी उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली आहे.यातूनच हे वितरण केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *