

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
पंढरपूर नगर पालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ६ हा विस्ताराने बराच मोठा असून महाद्वार चौक नदीकाठ परिसर ते कालिका देवी चौक रस्ता ते जामा मस्जिद मर्कज परिसर ते रामकृष्णहरी वृद्धाश्रम ते विष्णुपद ते चंद्रभागा पैलतीरावरील गाथा मंदिर ते संत नामदेव मंदिर परिसर अशी या प्रभाग क्रमांक ६ ची सीमारेषा प्रस्तावित करण्यात आली आहे.
२०११ च्या जणगणने नुसार या प्रभागाची एकूण लोकसंख्या ५६७६ निर्देशित करण्यात आली असून यामध्ये अनुसूचित जातीच्या २१२० तर अनुसूचित जमातीच्या ५६ अशी लोकसंख्या निर्देशित करण्यात आली आहे.