Uncategorized

प्रभाग क्रमांक ४ च्या सीमारेषेत मोठे फेरबदल प्रस्तावित

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा  निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.   

   पंढरपूर नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या सीमारेषा खालील नकाशात लाल रंगात दर्शविल्या असून या प्रभागाची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या  ५४४३ इतकी दर्शविण्यात आली आहे.यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १०६५ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १८७६ इतकी निर्देशित करण्यात आली असून पंढरपूर शहरातील ३६ नगरसेवकांच्या जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.प्रत्येक प्रभागातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने या २ जागा निश्चित केल्या जाणार असल्याने प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जमातीची सर्वाधिक १८७६ इतकी लोकसंख्या लक्षात घेऊन या प्रभातील १ जागा राखीव होऊ शकते.     पूर्वीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोठे बदल या प्रभाग रचनेत प्रस्तावित करण्यात आले असून जुनी पेठ चौक ते जयभवानी चौक ते क्रांतिचौक ते चंद्रभागेच्या पैलतीरावरील ओंकारनाथ देवस्थान  ते ६५ एकर परिसर ते अंबिका नगर झोपडपट्टी ते १९७ ब झोपड्पट्टी परिसर ते जुनीपेठ तालिमींसमोरील बाजू ते जुनी पेठ चौक अशा सीमारेषा प्रभाग क्रमांक ४ च्या प्रारूप रचनेत दर्शविण्यात आल्या आहेत.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *