Uncategorized

पंढरपूर नगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा  निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
     पंढरपूर नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या सीमारेषा खालील नकाशात लाल रंगात दर्शविल्या असून या प्रभागाची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या  ५५३९ इतकी असून यामध्ये अनुसूचित जाती ४१२ तर अनुसूचित जमातीचे ५८९ रहिवाशी समाविष्ट आहेत. कर्नल भोसले चौक,डाळे गल्ली परिसर ते लोकमान्य विद्यालय ते जुनी पेठ पोलीस चौकी ते जोजारे बोळ ते डाळे गल्लीचा काही परिसर अशी या प्रभागाची प्रस्तावित रचना आहे. डोंबे गल्ली ते कैकाडी महाराज मठ परिसर ते अनिल नगर ते उपजिल्हा रुग्णालय ते काशीकापडे गल्ली अशा सीमा प्रभाग क्रमांक ३ च्या प्रारूप रचनेत निश्चित करण्यात आल्या आहेत.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *