Uncategorized

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल नाराजी

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय सातत्याने चर्चेत राहिले आहे.या ठिकाणी शासनाकडून अनेक आधुनिक उपचार प्रणाली,रुग्णांचा तपासणीसाठी महागडी उपकरणे उपलब्ध करून दिलेले असतानाही या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.सोमवारी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माउली हळणवर यांनी खा.जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या समोरच तक्रारीचा पाढा वाचला होता.उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना येत असलेले अनुभव कथन केले होते.तर आज राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणीसाठी आल्याचे समजताच पंढरपुर शहर भाजपच्या वतीने त्यांना शासकीय विश्रामधाम येथे निवेदन देऊन उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारावा यासाठी लक्ष घालावे अशी मागणी केली.

   या बाबत अधिक माहिती देताना भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम शिरसट म्हणाले कि,अपघातात करकोळ जखमी झालेले रुग्ण,सिझेरियन प्रसूतीसाठी आलेल्या महिला अथवा इतर आकस्मात आरोग्य समस्य उदभवलेले रुग्ण उपचारासाठी जेव्हा उपजिल्हा रुग्णलयात येतात तेव्हा बहुतांश रुग्णांना थेट सोलापूरला जा,अथवा शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये जावा असे सांगितले जात असल्याचे दिसून येते.या बाबत विचारणा केली असता स्टाफ कमी असल्याचे कारण वारंवार सांगितले जाते. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी आरोग्य सुविधा कमी पडणार नाहीत असे शासन सांगते मात्र या उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर सामान्य नागिरकांना उलट अनुभव येतो.यामुळे आज आम्ही आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले आहे.त्याच बरोबर संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग कायमस्वरूपी चालू ठेवावा अशीही मागणी केली आहे.                                

 यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप माने, शहर अध्यक्ष विक्रम शिरसट,युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष लाला पानकर,प्रशांत सापनेकर, दीपक येळे, अक्षय वाडकर, भाऊ टमटम,लखन माने आदी उपस्थित होते.     

             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *