ताज्याघडामोडी

डीवायएसपी राजश्री पाटील यांना सावित्रीज्योती पुरस्कार जाहीर

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील अवैध धंद्यांचा कर्दनकाळ म्हणून काम करत असलेल्या सिंघम पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्रीताई पाटील यांना सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा सावित्रीज्योती पुरस्कार 2022 नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण दहा मार्च रोजी कुरूल येथे होणार आहे.

 अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद मोहोळ तालुका यांच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छोट्या मोठ्या जबरी चोऱ्या, दरोडा, अवैध वाहतूक, गुटखा वाहतूक रोखत कारवाईचा बडगा उगारून कायदा व सुव्यवस्थेवर अकुंश ठेवला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत उल्लेखनीय कार्याबद्दल राजश्री पाटील यांना”सावित्री ज्योती पुरस्काराने” गौरविण्यात येणार आहे.

  त्याच बरोबर कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शाळा वेब सिरीज वेब सिरीज मधील अभिनेत्री अनुष्री माने,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सारिका ढाणे मुंबई, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तेजस्विनी नामदे, शैक्षणिक क्षेत्रात अनिता वेळापूरकर,यांना या वर्षीचे सावित्री ज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

 या पुरस्काराचे वितरण मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

यावेळी मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अरुणा माळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रणिता ताई भालके, जिल्हा परिषद सदस्य शैलाताई गोडसे माजी सभापती जालिंदर लांडे कामती चे पोलीस निरीक्षक अंकुश माने दिपक माळी रमाकांत पाटील अश्विनी भानवसे सरपंच चंद्रकला पाटील यांचेसह समता परिषदेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *