ताज्याघडामोडी

संवाद कौशल्य व वक्तृत्व हि काळाची गरज- मैञेयी केसकर

स्वतःत मधील चांगला विचार समाजात न्यायचा असेल तर वक्तृत्व, कर्तृत्व असणे आवश्यक असुन या कर्तृत्वासाठी संवाद कौशल्य व वक्तृत्व स्वतःकडे असणे काळाची गरज असल्याचे मत मैञेयी केसकर यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये महिला दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले.

 महाविद्यालयाच्या वतीने मैञेयी केसरकर यांचे “व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पुढे बोलताना मैञेयी केसकर म्हणाल्या, व्यक्तिमत्व म्हणजे दिसणे नसुन असणे आहे. व्यक्तिमत्व म्हणजे देशप्रेम, वागणं, बोलणे यातुन दिसून येत असते. स्वतः मधील क्षमता शोधुन त्या दृष्टीने वाटचाल करणे अपेक्षित आहेत. व्यक्तिमत्व हे उठून दिसायचे असेल तर त्यासाठी कष्ट करणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्व विकासात मध्ये रंग रूपाला जास्त किंमत नाही.

अलीकडे श्रवण करण्याची मानसिकता खुपच कमी प्रमाणात आहे. एखादा चांगला अथवा वाईट विचार वारंवार कानावर पडले तर तसेच आपण घडत असतो. म्हणून चांगले विचार ऐकले तर आपण चांगल्या विचारातून पुढे जाऊ शकतो. चांगल्या विचारांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. सराव अन् सातत्य कायम ठेवणे गरजेच आहे. संवाद कौशल्य व वक्तृत्व हि काळाची गरज आहे.

सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वक्ता होणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्व विकसित करायचे असेल तर वक्तृत्व असणे खुप आवश्यक आहे. यातूनच पुढे कर्तुत्व सिद्ध होत असते. महिला दिन एका दिवसापुरता साजरा न करता तो कायम साजरा झाला पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा आदर केला तर आयुष्यात अश्यक काहीच नाही असे मत मैञेयी केसकर यांनी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले. यादरम्यान डॉ. वृषाली पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

   या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे यांनी प्रमुख पाहुणे मैथली केसकर व डाॅ. वृषाली पाटील यांचा परिचय करून दिला.

 यानंतर प्रमुख पाहुणे मैथली केसकर व डाॅ. वृषाली पाटील, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदीनी भोसले व वनिता चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अंजली चांदणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *