सांगोला – सांगोला शहरातील फॅबटेक पॉलीटेक्नीक मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आलेली असून या अभ्यासिकेत पन्नास हुन अधिक विद्यार्थी लाभ घेत असल्याची माहिती प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. अनिल वाघमोडे यांनी दिली.सदर अभ्यासिका फक्त मुलांसाठी दररोज सायं ६ ते १० या वेळेत सुरु असून हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला शहरात राहणारे फॅबटेकचे विद्यार्थी देखील याचा लाभ घेऊ शकतात. प्रथम वर्ष डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपली असून जानेवारी मध्ये पहिल्या सत्राची परीक्षा होणार आहे ,त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वेळ कमी असल्याने उपलब्ध वेळे मध्ये अभ्यासाची पूर्ण तयारी होण्याचा हेतूने या रात्र अभ्यासिकेचे आयोजन केल्याचे पॉलीटेक्नीक चे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी सांगितले.
