Uncategorized

प्रभाग क्रमांक ८ च्या प्रस्तावित रचनेत दाट लोकवस्तीचा समावेश

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा  निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
     पंढरपूर नगर पालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ८ मध्ये पंढरपूर नगर पालिका ते महावीर नगरचा काही परिसर ते शामियाना हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधीरोड देगलूरकर मठाचा परिसर या भागाचा समावेश आहे 
     २०११ च्या जणगणने नुसार या प्रभागाची एकूण लोकसंख्या ५०१९ इतकी निर्देशित करण्यात आली असून यामध्ये अनुसूचित जातीच्या ६७२ तर अनुसूचित जमातीची  ६७ अशी लोकसंख्या निर्देशित करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *