Uncategorized

सरकोली येथे अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपुर तालुक्यातील सरकोली हद्दीतील भीमा नदीकाठचा परिसर हा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक यामुळे कायम चर्चेत राहिला आहे.या परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत पंढरपूर तालुका पोलिसांनी वारंवार कारवाई केली असली तरी या भागातून सातत्याने वाळू उपसा होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत.मंगळवारी भल्या पहाटे ५ वाजता तालुका पोलिसांनी सरकोली बंधा-याजवळ वाळू वाहुतक होत असल्याची माहिती मिळाल्या नंतर केलेल्या कारवाईत अशोक लेलंड कंपणीचा सहा चाकी टिपर क्रमांक MH 10 CR 9234 चार ब्रास वाळुसह ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी पो.कॉ.अनिल वाघमारे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नामे गणेश सुभाष भालेराव वय 23 वर्ष रा सरकोली ता.पंढरपूर याच्या विरोधात भा.दं.वि. कलम379 सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/खरात,पोना/1698 आटपाडकर हेही सहभागी झाले होते.
आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात अवैध वाळू उपशाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दोन दिवसांनी पंढरपूर महसूल प्रशासनाने बऱ्याच महिन्यानंतर अनेक ठिकाणी कारवाईची धडक मोहीम राबिवली मात्र मात्र तालुक्यात सर्वाधिक कारवाया या पोलिसांनीच केल्या असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *