गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरात खाजगी सावकाराने घर लिहून घेत केली बेदम मारहाण

तिघांविरोधात गुन्हा दाखल

पंढरपूर शहर हे भूवैकुंठ म्हणून ओळखले जात असले तरी या शहरात वावरणाऱ्या सामान्य कष्टकरी माणसाला हे शहर खरेच भूवैकुंठ वाटते का ? असा प्रश्न कायम उपस्थित होत आला तो केवळ या शहरात राजकीय झूल पांघरून होत आलेल्या गुंडगिरीमुळे आणि राजकारणाशी संबंधित असलेल्या अवैध धंदेवाले कार्यकतें यांच्यामुळे.या शहरातील बेकायदा आणि जुलमी सावकारीच्या अनेक सुरस कथा  कुणाचा ना कुणाचा संदर्भ देत कायम चर्चेत असतात.

मात्र प्रत्यक्ष कारवाई होते ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतरच.आणी बऱ्याच वेळी सामान्य नागिरक हे एखाद्याचा मरणप्राय जाच सहन करत असतात नेमका तोच व्यक्ती राजकीय नेते,नगरसेवक अथवा राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या समवेत वावरत असल्याचे पाहिल्यानंतर सामान्य नागिरक हतबल होतो आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाही हेही कठोर वास्तव आहे.

३ जानेवारी रोजी भर दुपारी संतोष साळूंखेने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याच्या जवळ आढळलेल्या चिट्ठीत संतोष याने ५० हजार रुपये व्याजाने घेतल्याचे स्पष्ट झाले असून व्याजाने दिलेल्या पैशापोटी संतोष यास मारहाण करण्यात आली होती हेही मृत्यूपूर्व चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.या त्रासाला कंटाळून संतोष साळूंखे याने आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे चिट्ठीत नमूद करण्यात आल्याने पंढरपूर शहर पोलिसांनी या प्रकरणी शेखर कुंदूरकर सह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपूर शहर पोलिसांनी संतोष साळूंखे याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीची दखल घेत तात्काळ कारवाई करत शेखर कुंदूर यास तातडीने अटक केली असून त्यास आज न्यायालयात हजर केले असता १० जानेवारी पर्यत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.अवैध आणि जुलमी बेकायदा सावकारीचा त्रास सहन करू नका,तक्रार करण्यासाठी पुढे या असे आवाहन शहर पोलिसांकडून वारंवार केले जाते मात्र अशा सावकरांचा राजकीय नेत्यांसोबतचा वावर लक्षात घेऊन सहजासहजी नागिरक फिर्याद दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत अशीही चर्चा सातत्याने होते.मात्र संतोष साळूंखे आत्मत्या प्रकरणी शहर पोलिसांनी तातडीने पावले उचलल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *