Uncategorized

पंढरपूर शहरात Nisburd व Mitcon च्या उद्योग प्रशिक्षणाचा समारोप

पंढरपूर शहरात Nisburd या केंद्र सरकार संस्था व Mitcon यांच्या विद्यमाने पंढरपुर शहर व ग्रामीण भागात मागील 25 दिवसापासून सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा समारोप विविध उद्योगांचे पूर्ण झालेल्या विठ्ठल इन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. .सदर कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थीनी या कालावधीत तयार केलेल्या विविध वस्तू जसे अगरबत्ती तयार करणे , बेकरी उत्पादने , बॅग पर्स तयार करणे , वारकरी पोशाख, नऊवारी साडी , हॅण्डलूम वस्तू अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.


मिटकॉन कन्सल्टींग व इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. या संस्थेचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री चंद्रशेखर भोसले साहेब उपस्थित होते.नव उद्योजकांना विविध शासकीय योजना, अनुदान, उद्योजक घडत असताना येणाऱ्या अडचणी व मार्ग , कोण कोणत्या वस्तूंची ग्राहकांची गरज ओळखून निर्मिती करावी. गुणवत्ता कशी टिकवावे, पॅकिंग कसे असेल यांविषयी अनमोल मार्गदर्शन मिळाले. तसेच केंद्र सरकारची होली सिटी अंतर्गत पंढरपुर ची निवड का आणि कशी झाली याची माहिती दिली.होली सिटी अंतर्गत केंद्र व राज्य शासन यांचे विविध प्रोजेक्ट काय आहेत याचे मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात नव उद्योजकांना शासकीय स्तरावर मार्गदर्शन व मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. श्री लोंढे सर यांनीही सर्व नव उद्योजकांचे होली सिटी अंतर्गत सुपर मार्केट असावे ही संकल्पना मांडली.
या कार्यक्रमांसाठी श्री चंद्रकांत लोंढे , सोलापूर जिल्ह्य़ा प्रोजेक्ट ऑफिसर , श्री माउली सर मिटकॉन एरिया मॅनेजर तसेच श्री तावसे, श्री प्रसाद, श्री धोरवट, श्री बोडके हे पंढरपुर शाखेतील सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *