पवार कुटुंबीयांवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली आहे. ते बुधवारी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजा-समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.
