

गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत असून या बाबत झालेल्या कारवायात मध्ये महसूल व पोलीस खात्याचे कर्मचारी सर्वाधिक सापळ्यात अडकले आहेत.जात पडताळणी समितीमध्येही लाचखोरी होत असल्याचे आढळून आले असून जात पडताळणी समितीच्या पुणे उपायुक्त असलेल्या नितीन ढगे या अधिकाऱ्याने जात पडताळणी समितीचा वैधता दाखल देण्यासाठी मुळशी तालुक्यातील एका इसमास ८ लाखाची मागणी केली या पैकी १ लाख ९० हजार रुपये रोख स्वरूपात केदारी पेट्रोल पंप येथे स्वीकारताना रंगेहात पडकण्यात आले आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ नुसार उपायुक्त नितीन ढगे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.