Uncategorized

घरकुल लाभार्थ्याच्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी सहकार विभागाची मदत घेणार – सीईओ दिलीप स्वामी

महाआवास अभियान ग्रामीण २ अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली महाआवास अभियान ग्रामीण २ अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक दिनांक ३० नो २०२ रोजी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजीकक्षात संपन्न झाली.

सदर बैठकिमध्ये मागील केंद्र पुरस्कृत ११४७८ व राज्य पुरस्कृत २७२० असे एकूण २४९९८ अपुर्ण घरकुले जानेवारी २०२२ अखेर पुर्ण करणे बाबत नियोजन करण्यात आले आहे. सदर घरकुले पुर्ण करणेकामी सलग्न आवश्यक यंत्रणेकडून सहकार्य घेणे त्यानंतर कृती संगम करणे इ. विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्यानं जागी अभावी जी घरकुले सुरू झालेली नाहीत अशा घरकुलांना जागा उपलब्ध करून देणे याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत गावठाण, सरकारी जागा उपलब्ध करून देणे बाबत नियोजन करण्यात आले. बक्षिस पत्राच्या माध्यमातुन २५६ लाभार्थीनी जागेची मागणी केली आहे. अशा लाभाथीना बक्षिस पत्र करून देणे कामी संबंधीत यंत्रणेस मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत लेखी पत्राव्दारे सुचना देण्यात येतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सोलापूर यांनी सांगितले.

गावपातळीवर घरकुल लाभार्थ्याच्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करणेकामी सहकार विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येईल व याकामी तालुकास्तरावरून संबंधित गटविकास अधिकारी हे सहकार्य करतील. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मार्फत घरकुल लाभार्थ्यांना सौभाग्य योजना अंतर्गत बोज कनेक्शन, उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन, मनरेगा विभागामार्फत मनरेगा अनुदानाचा लाभ, स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातुन उपजिविकेचे साधन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणेसाठी अनुदान, घरकुल बांधकामासाठी बँके मार्फत अर्थसहाय्य इ. बाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हास्तरीय समिती सभेस उपस्थित असलेल्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यामाकामी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे प्रतिनिधी, अग्रणी बँक व्यवस्थापक मनरेगा कक्ष, प्रकल्प संचालक स्वच्छता विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सहा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग, सहाय्यक कामगार आयुक्त यांचे प्रतिनिधी जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.

घरकुल लाभार्थ्यांना कृती संगम व्दारे लाभ देणेकामी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करावे व मेळाव्यास संबंधित विभागाचे प्रतिनिधी, अधिकारी यांनी उपस्थित राहून घरकुल लाभार्थीस कृती संगम व्दारे लाभ दयावा असे आवाहन सर्व उपस्थितांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी यांनी कृती संगम योजने बाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात येईल असे सांगितले महाआवास अभियान राबविताना येणाऱ्या अडीअडचणी वर चर्चा झाली. त्यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व उपस्थितांचे आभार मानून प्रकल्प संचालक तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभा संपन्न झालेचे जाहिर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *