ताज्याघडामोडी

विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम तात्काळ थांबवा

पंढरपुर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून,छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून  महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडण्यात येत आहे.   महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्या वाचून सुकत आहेत. आधीच कोरोना मुळे गेले दोन वर्षे सामान्य नागिरक,छोटे मोठे व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

पंढरपूर तालुक्यात ऊस,द्राक्ष,केळी,डाळींब आदी पिकांना वेळेत पाणी देणे गरजेचे असते मात्र महावितरण कडून थेट कनेक्शन कट केले जात असल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा समाना करताना कसा बसा टिकून राहिलेला शेतकरी महावितरणच्या या मोहिमेमुळे उध्वस्त होणार आहे.त्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागणार आहे.जर तात्काळ हि मोहीम थांबविली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.   

     या बाबत आज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री गवळी यांना भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले असून यावेळी यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के,अनुसूचित जमाती सेलचे अध्यक्ष लक्ष्मण धनवडे,शहर अध्यक्ष विक्रम शिरसट,यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *