जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती महा.राज्य च्या नेत्रृत्वात दिनांक 22 नोव्हेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथून पेंशन संघर्ष याञेला सुरवात झाली आहे. राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांची जुनी पेंशन योजना ही बंद करून DCPS व NPS सारखी योजना सुरू करण्याचे आदेशीत केले आहे.परंतु सदरची योजना ही कर्मचारी यांच्यासाठी अतिशय फसव्या स्वरूपाची असून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 850 शिक्षक बांधव मयत झाले आहेत. त्या कटुंबाच्या वारसांना आजर्यंत कोणताही लाभ मिळालेला नाही.त्यामुळे सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये सदरच्या योजनेविषयी प्रचंड नाराजी आहे असे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी या अभियानाच्या प्रास्ताविकामध्ये आपले मत मांडले आहे.
1982 ची जुनी पेंशन सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांना लागू करण्यात या एकमेव मागणी साठी जुनी पेंशन संघर्ष समिती महा.राज्य च्या नेतृत्वात जुनी पेंशन संघर्ष याञा सुरू झाली आहे. या याञेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी शिक्षक सहकार संघटनेकडून संपर्क अभियानास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतीनिधींना या संघर्ष याञेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष भेटी घेऊन आवाहन केले असल्याचे पुणे विभागीय सचिव दिपक परचंडे यांनी केले आहे.
जुनी पेंशन संघर्ष याञा ही दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात येत आहे, अकलूज या ठिकाणी भव्य पेंशन एल्गार परिषदेचे आयोजन केले आहे,तेव्हा जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी येथे उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीने केले आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी सचिन निरगिडे,रविंद्र जेटगी,राजेंद्र पडदुणे,मंगेश नकाते,राजेंद्र वाघमोडे,बजरंग कोळी,ज्ञानेश्वर पिसाळ,आबासाहेब तरंगे,नेहरू राठोड,सुनिल पवार, सुनिल फुंदे, विजय बबलेश्वर,सुनिल राठोड,समीर कोरबू,संतोष धोञे,सुनिल नाईकनवरे,लक्ष्मण राठोड,म्हाळाप्पा लवटे,संजय दवले,धनाजी मचाले,सचिन वलेकर, श्रीमंत कोळी,अनिल कोल्हटकर,उमेश जामदार,सोमनिंग बिराजदार,गणेश देशमुख,सिद्धाराम कोळी,श्रीकृष्ण शेतसंधी,राजू राठोड,अनिल राठोड,राजकुमार कोळी,धर्मण्णा चुंगीवडियार,मुश्रीफ शेख,तानाजी व्हनमाने,गणेश नागणसुरे,नागनाथ बिराजदार,संगमेश्वर कोणदे,दीपक कांबळे व इरेशा बोरगाव इत्यादी परिश्रम घेत असून सर्वांना संघर्ष याञेत सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत.