ताज्याघडामोडी

अबब..कायदेशीर उत्पन्नापेक्षा  नगराध्यक्षाकडे आढळली  कोटयवधींची मालमत्ता 

पैशाच्या बळावर राजकरणात दबदबा वाढवीत सत्तेतील महत्वपूर्ण पदे पदरात पाडून घेत या पदाच्या माध्यमातून अफाट माया गोळा करायची,बहुमताच्या जोरावर आणि साम,दाम,दंड,भेद याचा वापर करत बोगस टेंडर,अंदाजपञक फुगवलेले विविध खऱ्या अथवा खोट्या कामाचे टेंडर काढायचे आणि वर्षाकाठी लाखो रुपये कमवत स्थावर,जंगम मालमत्ता वाढवीत न्यायच्या असा प्रकार राज्यातील अनेक नगर पालिकांमध्ये होत असल्याचा आरोप होताना दिसून येतो.मात्र कधी कधी आरोप करणारे केवळ आरोप करत नाहीत तर पुराव्यानिशी तक्रार करतात,ज्ञात उत्पन्नापेक्षा नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्याकडे एवढी भरमसाठ संप्पती आली कशी याची चौकशी व्हावी अशी मागणी करतात आणि कुठल्याही दबावाला न भिता त्याचा पाठपुरावा करतात.असाच प्रकार मेहकर नगर पालिकेत घडला होता आणि एप्रिल महिन्यात नगर विकास विभागाने चौकशीचे आदेश दिले होते.मेहकर नगर पालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या कारवाई मुळे राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात दबाव झुगारत पाठपुरावा करणारे जागरूक नागिरक यांना बळ मिळणार आहे.                

 

मेहकर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कासम गवळी आणि त्यांच्या पत्नी हसीना कासम गवळी यांच्या घरी एसीबीने रेड टाकली आहे. दोघांनीही नगराध्यक्ष काळामध्ये बेनामी संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

2006 ते 2020 दरम्यान नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या कालावधीत लोकसेवक या पदाचा दुरुपयोग करुन त्यांच्या ज्ञात व कायदेशीर उत्पन्नापेक्षा विसंगत अशी एकून रु. 50988495/- (812.89%) एवढी अप संपदा स्व:ताच्या तसेच पत्नी हसीना कासम गवळी हिचे नावे बाळगल्या बाबत समाधान कारक खुलासा सादर करु शकले नाही.

 

त्याचप्रमाणे कासम गवळी यांच्या गैरकृत्यास त्याची पत्नी हसीना गवळी यांनी रु. 9845517/- एवढी मालमत्ता अप संपदा आहे. हे माहीत असून देखील ती जाणीव पुर्वक स्वत:च्या नावे धारण करुन ती कब्जात बाळगणेकामी कासम पिरु गवळी यांना साहाय केले आहे. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्या अगोदर मेहकरच्या माजी नगरअध्यक्षा हसीना बी कासम गवळी यांनी सत्तेचा दुरुपयोग करून सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत हसीनाबी कासम गवळी यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी रद्दबातल केले आहे.

 

या कारवाईमुळे आमदार,खासदार यांना विधानसभा,लोकसभा निवडणुकीत लीड देऊन खुश करत त्या बदल्यात नगर पालिकेत पदे पदरात पाडून घेत मनमानी करत विविध निविदा प्रक्रियेतील लूप होल्सचा गैरफायदा घेणारे व शून्यातून सुरुवात करत कुठलाही कायदेशीर उधोग व्यवसाय न करता केवळ राजकारण हेच आर्थिक प्रगतीचे साधन समजत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोट्याधीश होणाऱ्यांची झोप उडणार असून एखादा सामान्य जागरूक नागिरक काय करू शकतो हे मेहकर येथील लाचलुचपत विभागाने अपसंपदा प्रकरणी कारवाईतून सिद्ध झाले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *