ताज्याघडामोडी

राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे.

पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव

पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं आहे.

सहापैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती

सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.

ओमिक्रॉनच्या रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणं

यात ओमिक्रॉनबाधित महिलेला सौम्य लक्षणं आहेत, मात्र इतर पाच जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. हे सर्व पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 8 वर

काल कल्याण-डोंबिवलीत 1 रुग्ण आढळला होता, त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं होतं. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये 5 तर पुण्यात 1 ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानं प्रसानाची डोकेदुखी खूप वाढली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रोनचा प्रसार वेगाने होत असल्यानं आता देशाची चिंताही वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *