ताज्याघडामोडी

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही भारतीय स्टेट बँक चे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. तुमचे पॅन कार्ड 10 दिवसानंतर काम करणे बंद होईल. सोबतच बचत खात्यावर वाईट परिणाम होईल. एसबीआयने SBI आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केले आहे. बँकेने सावध केले आहे की, 30 जूनच्या पूर्वी ग्राहकांनी आपले PAN आणि आधार लिंक करावे. अन्यथा ट्रांजक्शनमध्ये अडचणी येऊ शकतात, बचत खाते सुद्धा प्रभावित होईल.

एसबीआयने ट्विट SBI Tweet करून आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की, आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे.जर पॅन आणि आधारला लिंक केले नाही तर पॅन इनअ‍ॅक्टिव्ह होईल आणि ग्राहकांना ट्रांजक्शनमध्ये अडचणी येईल.पॅन आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे.एसबीआयने ट्विट करत माहिती दिली की, आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे.

जर पॅन आणि आधार ठरलेल्या कालावधीत 30 जूनपर्यंत लिंक केले नाही तर पॅन इनअ‍ॅक्टिव्ह होईल आणि ग्राहकांना ट्रांजक्शनमध्ये अडचणी येईल.यानंतर ग्राहक आपले पैसे काढू शकणार नाही.सोबतच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही.पॅन कार्डशी आधार लिंक केले नाही तर कलम-234क च्या अंतर्गत तुमच्यावर कमाल 1,000 रुपयांचा दंड लागू शकतो.

तर, बँकेने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे की, ते घरबसल्या ही KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता. एसबीआयने म्हटले की, ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी ब्रँचमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. केवायसी अपडेशनसाठी आवश्यक डॉक्यूमेंट पोस्टाने किंवा मेलद्वारे पाठवल्यास स्वीकारले जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *