Uncategorized

विट्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून पट.कुरोली येथे सभासदांना दीपावली निमित्त साखर वाटप

सोलापूर जिल्ह्यात उचचांकी गाळपाचे अनेक पुरस्कार प्राप्त केलेला व सर्वाधिक दर देणारा व ऊस गाळपास पाठविलेल्या शेतकऱ्यांना वेळेत उसाची बिले अदा करणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  विट्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याकडून चेअरमन आ.बबनदादा शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दीपावली सणानिमित्त आज पटवर्धन कुरोली ता.पंढरपूर येथे सभासदांना साखर वाटप करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती देताना नागेश उपासे म्हणाले कि, सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी पूर्णपणे देऊ शकले नसताना व अनेक साखर कारखान्यांचा रेड झोनमध्ये समावेश साखर आयुक्तांनी केलेला असताना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर ता.माढा व युनिट क्रमांक २ करकंब या दोन्ही कारखान्याने आगामी गळीत हंगामाची जोरदार तयारी केली असून दीपावली दसऱ्यासाठी 176 रु चे बिल जमा केले,तर आता सभासदांना साखर घरपोहोच केली जात आहे.कारखान्याच्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. यावेळी नागेश उपासे, शिवाजीदादा नाईकनवरे, काका उपासे,संपत्ति जवलेकर, औदुबर उपासे, विष्णु नाईक अण्णा नाईकनवरे, आप्पा नाईकनवरे, सोमनाथ देशमूख, कारखाना चिटबॉय माली साहेब, तसेच सर्वशेतकरी सभासद उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *