ताज्याघडामोडी

अन्न विभागाने कारवाई करूनही गुरुकृपा डेअरी चालक जुमानेना

अन्न विभागाकडून निर्धारित परवाना प्राप्त न करता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील गुरुकृपा डेअरी चालकाकडून दुग्धजन्य व अन्न पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच सह.अन्न आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी १५ जुलै २०२१ रोजी कारवाई करीत सदर गुरुकृपा डेअरी हि आस्थापना बंद ठेवण्यास सांगितले होते.या कारवाईची पंढरपुर शहरात मोठी चर्चा झाली होती.मात्र कारवाई होऊनही सदर गुरुकृपा डेअरी चालकाने आपला व्यवसाय सुरूच ठेवल्याने अन्न विभागाने केलेली कारवाईची बातमी खरी कि खोटी अशी चर्चाही या परिसरात होताना दिसून आली होती.

या बाबतची माहिती मिळताच अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी दिनांक 26/07/2021 रोजी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात सदर गुरुकृपा डेअरीचे चालक बालाजी राजेश माळी वय 24 वर्षे रा परदेशी नगर प्लाँट क्र.59 रेल्वे स्टेशन जवळ पंढरपुर यांच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी या लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन गुरुकृपा डेअरी हि आस्थापना चालु ठेवल्याचे दिसुन आले व अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत परवाना न घेता व्यवसाय चालु ठेवल्याने भादवि कलम 188, सह अन्न सुरक्षा व मानके अधि.2006चे कलम 63 प्रमाणे महाराष्ट्र सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *