ताज्याघडामोडी

धनगर समाजाचा आणखी एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आता चांगलाच जोर लावायला सुरुवात केली आहे.

त्यामुळे, येत्या सदर निवडणुकीच्या काळात महाविकासआघाडी होईल की, नाही याची शास्वती नसल्याने राष्ट्रवादी आपला पाया मजबूत करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान, आता मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे यांचा देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. सुरेश कांबळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करत हा वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा धक्का मनाला जात आहे.

येत्या १६ सप्टेंबरला कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

दरम्यान, भूम येथे कार्यकर्ता मेळावा घेत येत्या १६ सप्टेंबरला कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून भूम परंडा वाशी मतदारसंघात तानाजी सावंत आणि राहुल मोठे यांच्या विरोधात सुरेश कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. येत्या १६ सप्टेंबरलाच मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर घड्याळ बांधणार आहे. पुणेकर यांच्यासोबत इतर १६ कलावंतही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

सुरेश कांबळे यांच्या प्रवेशाने उस्मानाबादच्या राष्ट्रवादीला मिळणार ताकत

सध्या भाजपात असलेले तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीत असताना उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचा बालेक्कीला समजला जायचा मात्र, आमदार राणाजगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीला सोडून गेल्यापासून जिल्ह्याला उतरती कळा लागली असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या उस्मानाबादच्या राष्ट्रवादीत कोणीही सक्षम आणि आक्रमक नेतृत्व नसल्याने सुरेश कांबळे यांच्या रूपाने आक्रमक नेतृत्व जिल्ह्याला मिळेल त्यामुळे सुरेश कांबळे यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वी सुरेश कांबळे यांनी केलं आहे धनगर समाजाचे नेतृत्व

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात धनगर बांधवांची मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या जिल्ह्यात धनगर समजला देखील कोणीही नेता नसल्याने सुरेश कांबळे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सुरेश कांबळे यांनी यापूर्वी मल्हार आर्मीच्या माध्यमातून अनेक धनगर समाजाच्या बांधवांची कामे केली असल्याने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *