ताज्याघडामोडी

कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार,पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी

कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार

 

पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी – 

इंजिनिअरिंग, मेडिकल, वाणिज्य, बँकिंक, विधी, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणार”

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांनी गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी केली असून विद्यार्थी दशेपासून चळवळीतील एक कार्यकर्ता, उत्तम वक्ता आणि अभ्यासू म्हणून त्यांची प्रतिमा आहे. पदविधरांच्या शैक्षणिक आणि बेरोजगारी संबंधी अनेक समस्या त्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेत. इंजिनिअरिंग, कृषी, पॅरा मेडिकल , या क्षेत्रात प्रचंड बजबजपुरी झाली आहे, इंजिनिअर होऊन युवकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारांचे लोंढे तयार झालेत आणि कोणताही पदवीधर आमदार हे मुद्दे घेऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भांडताना दिसत नाही. नव्याने वकिली व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवकांना कर्जासाठी बँक दारात उभे राहू देत नाही तीच अवस्था कृषी आणि वाणिज्य विषयात काम करणाऱ्या पदविधरांची झाली आहे.

उच्च पदविधरांची नेट सेट, पी एच डी पदव्या घेऊनही बेरोजगारी वर आवाज उठत नाही. शैक्षणिक क्षेत्रात नोकर भरती करणे आणि त्या दरम्यान होणाऱ्या आर्थिक शोषणाविरुद्ध डॉ खंदारे त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. अनेक वेळा शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि विविध समस्ये विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. डॉ निलकंठ खंदारे शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य असल्याने वेळोवेळी त्यांनी विद्यार्थी व समाज हिताचे प्रश्न विविध व्यासपीठावर मांडले आहेत. पदवीधर आमदारांनी सोडवावे असे कित्येक प्रश्न आजही जसेच्या तसे असून ते सोडविण्यासाठी त्यांच्या उमेदवारीला विविध शिक्षक, पदवीधर, माजी विद्यार्थी तसेच समाजीक व राजकीय संघटनांनी त्यांना या कामी पाठिंबा देऊ केला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी पुणे मतदारसंघात नाव नोंदणी प्रक्रियेपासून आजपर्यंत ३ वेळा दौरा करून मिटिंग घेऊन विविध संघटनांचा पाठिंबा मिळविला आहे आणि एक लाख पेक्षा जास्त मते नोंदविण्यात यश मिळवले आहे त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा उमेदवार असावा अशी अपेक्षा करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक संघटनांच्या अपेक्षा त्यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने पूर्ण झाल्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांची दोन लाख पेक्षा जास्त मते असल्याने त्यांच्या उमेदवारीला अनन्य साधारण महत्व आहे असे जाणकारांना वाटते. ते या निवडणुकीत निश्चित यशस्वी होतील यासाठी विविध संघटना काम करत असून त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *