गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अनैतिक संबंध आणि पैशाचा वादातून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच भावाची आत्महत्या

ओळखीचा फायदा घेत २ लाख रुपये उसने घेतले,ओळखीचा फायदा घेत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले आणि हे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर भावाने पत्नीला माहेरी घालवून दिल्याने राग धरत व उसनेने घेतलेले पैसे बुडविण्याच्या हेतून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच माझ्या भावाने स्वतःचे राहते घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद ३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या बहिणीने पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या प्रकरणी १ संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे समजते.             

या बाबत दाखल फिर्यादीनुसार सदर मयत तरुण व त्याची बहीण हे पंढरपुर शहरापासून जवळच असलेल्या एका गावात शेजारीच राहतात.त्यांच्या घनिष्ठ ओळखीच्या गावातीलच एका व्यक्तीने या बहीण भावाकडून २ लाख रुपये उसने घेतले होते.यातील १ लाख रुपये त्याने परत केले मात्र याच काळात त्याचे मयताच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध निर्माण झाले.१९ जानेवारी २०२१ रोजी या दोघांना मयताने एकत्रित रंगेहाथ पकडल्यानंतर हा वाद विकोपाला गेला व त्यातूनच दुसऱ्या पत्नीस माहेरी पाठविण्यात आले.त्यामुळे सदर प्रकरणातील आरोपी हा या बहीण भावावर चिडून होता.यातूनच त्याने मयतास जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच,वारंवार जीवे मारण्याची देत असल्यानेच मानसिक त्रास होऊन माझ्या भावाने आत्महत्या केली आहे अशी फिर्याद मयताच्या बहिणीने पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *